
जिल्हा नियोजनचा निधी ३०० कोटी वरून ३६० कोटीवर* *निधी वाढवून आणण्याच्या कामात पालकमंत्री उदय सामंत यांना मोठे यश*
*महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी चालना मिळावी यासाठी जिल्हा नियोजनाच्या निधीत भर पाडण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु होते. मात्र त्या प्रयत्नाना यश आले असून रत्नागिरी जिल्हा नियोजनचा निधी ३०० कोटी वरून तब्ब ३६० कोटी ऐवढा झाला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी ६० कोटी इतका निधी वाढीव मिळाला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून रत्नागिरी जिल्हावासियांना एक अनोखी भेट दिली आहे.मिळालेल्या वाढीव निधीतून रत्नागिरीच्या विकासासात भर पडणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीच्या जिल्हा नियोजनासाठी ६० कोटींचा वाढीव निधी आणल्याने रत्नागिरी जिल्ह्यातुन त्यांचे अभिनंदन केले जात आहेत.www.konkantoday.com