कोंकण विभागात मराठा आरक्षणाचे सर्वेक्षण शंभर टक्के पूर्ण_________ महसूल यंत्रणेसोबत इतर विभागांच्या मदतीने कोकण विभागात मराठा आरक्षणाचे सर्वेक्षण शंभर टक्के पूर्ण झाले आहे. अशी माहिती कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली.

        मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याची मोहीम हाती घेतली होती.  23 जानेवारी पासून सुरु झालेल्या या मोहीमेत महसूल यंत्रणेसह इतर विभागांचे अधिकारी कर्मचारी सहभागी होते. अंगणवाडी सेविका, माध्यमिक आणि प्राथमीक शाळेचे शिक्षक, महानगरपालिकेचे कर्मचारी असे जवळपास साडेचार लाख प्रगनक महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात या मोहीमेसाठी राज्यभर  काम करत होते. तर 200 हून अधिक डेटाबेस सेंटर सुरू होते. सर्वेक्षणासाठी खास सॉफ्टवेअरही तयार करण्यात आलं होत. 02 फेब्रुवारीला मध्यरात्री बारा वाजता हे सर्वेक्षण संपल असून, कोकण विभागात हे सर्वेक्षण 100 टक्के पूर्ण झाल आहे. या सर्वेक्षणात संकलीत केलेली माहिती मागासवर्ग आयोगाकडे सादर करण्यात येईल. यावरून अहवाल तयार केला जाईल आणि तो शासनाकडे  सादर करण्यात येणार आहे.   

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button