*संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओच्या**रुग्ण मदत केंद्राची यशस्वी पाच वर्षे*
6 फेब्रुवारी 2019 रोजी संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी ने रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्ण मदत केंद्राचा शुभारंभ केला.आज या रुग्ण मदत केंद्राला *5* वर्षे पूर्ण होत आहेत. आमचा उद्देश कितपत यशस्वी होईल ही शंका होती.उद्देश हा होता की,या हॉस्पिटलमध्ये जिल्ह्यातून अनेक रुग्ण येत असतात, त्यांना पटकन उपचार मिळावे ही भावना असते, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अनेक विभाग आहेत,अनेक इमारती आहेत, त्यामुळे कोणत्या इमारतीत कोणते उपचार होतात याची माहिती नसते ,त्यामुळे आलेला रुग्ण व त्याचे नातेवाईक यांचा गोंधळ होतो आणि मग गैरसमजातून काही खटके उडत होते,यासर्व गोष्टी आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही सामाजिक विधी प्राधिकरण विभागाचे सचिव मा, जिल्हा न्यायाधीश यांची भेट घेतली आणि वस्तुस्थिती सांगितली त्यांनाही ते समजले ,लगेच त्यांनी ही बाब जिल्हा शल्यचिकित्सक यांचे निदर्शनास आणून दिली आणि संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी ला अपघात विभागात एक रुग्ण मदत केंद्रासाठी जागा देण्याची विनंती केली,यासाठी रितसर परवानगी घेवून आम्ही *6 फेब्रुवारी 2019* रोजी तेथे रुग्ण मदत केंद्र सुरु केले. आज पाच वर्षांत हजारों रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना योग्य मार्गदर्शन देण्यात आले,शासकीय विविध योजना आलेल्या रुग्णांना समजून सांगितली जाते,दिव्यांगांना योग्य सहकार्य केले जाते,महिला आणि गरोदर महिला रुग्णांना त्यांना उपचारासाठी कोठे जावे हे सांगितले जाते,ज्येष्ठ नागरिक यांचे साठी कोणत्या योजना आहेत तसेच हॉस्पिटलमध्ये असलेल्या सर्व विभागांची आणि तेथे मिळणा-या सर्व सोयीसुविधांची माहिती ही अगदी विनामूल्य दिली जाते.अडचणीत असलेल्या रुग्णांना तातडीने जेव्हा रक्ताची गरज असते त्यावेळी त्यांना तात्काळ रक्त देणे,रक्तदात्यांना संपर्क साधून रक्त देणे,नवजात शिशुसाठी कपडे देणे,गरीब रुग्णांना डायपर देणे, निराधार व्यक्तींना शासनाच्या बेघर योजनेत समाविष्ट करून त्यांना बेघरा मध्ये नेवून सोडणे,गरीब गरजू रुग्णांना माफक दरात रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे अशी वैद्यकीय मदत आम्ही सतत करीत असतो , तसेच सहा महिन्यातून एकदा रक्तदान शिबीर आयोजित करुन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या आणि त्यांना रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना रक्तदान कार्ड मोफत देवून त्यांची अडचण दूर केली जाते,या रुग्ण मदत केंद्रात सौ निकीता कांबळे या कोऑर्डिनेटर म्हणून प्रामाणिक पणाने काम करीत आहेत, त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून अनेक सामाजिक संस्थांनी आणि शासनाने त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे .आपल्या संस्थेच्या प्रामाणिक कामाची आणि सातत्याने सामाजिक कार्य करत आहोत याची दखल समाजानेही वेळोवेळी घेतली असून काही दानशूर व्यक्ती आम्हाला आर्थिक मदत करीत आहेत,पण हे प्रमाण अल्प आहे,आमच्या अनेक योजना आहेत मात्र आर्थिक बळकटीशिवाय ते काहीसे रेंगाळले आहेत,पण नक्कीच आम्ही ते यश मिळवू.आमच्या संस्थेचे संस्थापक मरहुम दिलावर कोंडकरी यांच्या आदर्शानुसार आम्ही काम करीत आहोत.आमचे पदाधिकारी, सभासद यांचेही मोलाचे सहकार्य लाभत आहे, आपल्या कामाची दखल आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चे डीन जयप्रकाश रामानंद यांनी घेतली आणि एक अत्याधुनिक केबीन आपल्या संस्थेच्या रुग्ण मदत केंद्राला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दिली आहे,आमच्यावर जो विश्वास त्यांनी दाखवला आहे नक्कीच तो विश्वास आम्ही सार्थकी लावू,आणि आमच्या कडून याही पुढे अशीच सेवा आम्ही देत राहू … *शकील गवाणकर* अध्यक्ष*संपर्क युनिक फाउंडेशन* एनजीओ रत्नागिरीwww.konkantoday.com