लग्नासाठी पोरगी मिळावी, शहरात समुद्र झालाच पाहिजे अन् मटन स्वस्त झाले पाहिजे, अशा मागण्या करणारी अनोख्या रॅलीने कोल्हापुरांचे लक्ष वेधले
लग्नासाठी पोरगी मिळावी, शहरात समुद्र झालाच पाहिजे अन् मटन स्वस्त झाले पाहिजे, अशा मागण्या करणारी अनोख्या रॅलीने कोल्हापुरांचे लक्ष वेधले
या रॅलीची चर्चा सुद्धा आता अख्ख्या कोल्हापुरात रंगली आहे.कोल्हापुरातील सायकल रॅलीस खासबाग मैदान येथून सुरुवात झाली. पंचगंगा नदीच्या संगमापर्यंत ही रॅली निघाली. अनोख्या रॅलीची चर्चा कोल्हापुरात सुरू होती. कारण या रॅलीत वेगवेगळे फलक लावण्यात आले होते. त्यात लग्नासाठी पोरगी मिळालीच पाहिजे, कोल्हापुरात समुद्र झालाच, मटन स्वस्त झालेच पाहिजे, पेट्रोल फुकट मिळालेच पाहिजे, अशा अनेक मजेदार मागण्या होत्या. मंगळवार पेठेतीली चिक्कू मंडळाकडून ही रॅली काढण्यात आली. रॅलीची सुरुवातही अभिनेत्री माधुरी दीक्षितचा फोटो लावलेल्या सायकलचे पूजन करून या झाली होती.
एकीकडे मजेदार फलक असणाऱ्या या सायकल रॅलीचा उद्देश काय होता? याची चर्चा कोल्हापूरकरांमध्ये रंगली होती. या रॅलीचा उद्देश आरोग्यासंदर्भात जागृतीचा होता. नागरिकांनी सायकलचा वापर करून प्रदूषण टाळले पाहिजे आणि आपलं आरोग्य सुद्धा जपले पाहिजे, हा उद्देश रॅलीचा होता.
कोल्हापूर शहरातील खासबाग ते मिरजकर तिकटी, बिनखांभी गणेश मंदिर, महाद्वार रोड करत रॅली शिवाजी पुलावरून मुख्य मार्गावरून प्रयाग चिखलीपर्यंत रॅली पोहोचली. ही अनोखी सायकल रॅली पाहून अनेकांना कुतूहल वाटत होते. रॅलीत सर्वच वयोगटातील नागरिक सहभागी झाले होते.
www.konkantoday.com