*राजापूर पोलीसांनी ”शिंपल्यांची कच” चोरी करणाऱ्या एकास ताब्यात घेतले*
__राजापूर पोलीसांनी ”शिंपल्यांची कच” चोरी करणाऱ्या एकास ताब्यात घेतले 05/02/2024 रोजी 22.00 वाजण्याच्या दरम्यान राजापूर पोलीस ठाणे येथे गोपनीय कामकाज करणारे पोलीस अंमलदार पो.ना./८१२ श्री. सचिन वीर यांना एक गोपनीय माहीती प्राप्त झाली की, “साखर कोंभे या ठिकाणाहून शिंपल्यांची कच भरलेला एक आयशर टेम्पो गैरकायदा विनापरवाना वाहतूक करत आहे”. लागलीच राजापूर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. फुलचंद मेंगडे यांना याबाबत कळविण्यात आले व त्यांनी राजापूर पोलीस ठाणे हद्दी मधील हातिवले येथे या गैरकायदा विनापरवाना शिंपल्यांची कच वाहतूक करत असलेल्या आयशर टेम्पोला पकडण्याकरिता एक पथक नेमले.हातिवले येथील मुंबई- गोवा महामार्गावर या पथकाला गस्त घालत असताना रात्री 23.00 वाजण्याच्या दरम्याने हातिवले, जोशी पेट्रोलपंप समोरील महामार्गावर एक लाल रंगाचा आयशर टेम्पो येत असताना दिसला. या टेम्पोचा या पथकाला संशय आल्याने त्यांनी टेम्पो थांबविण्याचा इशारा केला व महामार्गाच्या एका बाजूला थांबवून टेम्पोच्या मागील हौदावर असलेली ताडपत्री वर करून पाहिली असता हौदामध्ये शिंपल्यांचा कच भरलेला दिसला.या पथकाने टेम्पोवरील चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव दत्ता बाळासाहेब राऊत वय 43 वर्षे रा. कागल बिरदेव वसाहत कागल, जि. कोल्हापूर असे सांगितले व टेम्पो मधील मालाचे वजन १५ टन असल्याचे सांगितले. सदरच्या मालाबाबत टेम्पो चालकाकडे कोणताही खरेदी अगर वाहतुकीचा परवाना नसल्याने तो माल त्याने चोरुन आणल्याची खात्री या पथकाला झाली.या गुन्ह्यामधील आरोपी टेम्पो चालक दत्ता बाळासाहेब राऊत वय 43 वर्षे रा. कागल बिरदेव वसाहत कागल, जि. कोल्हापूर, याला ताब्यात घेण्यात आलेले आहे तसेच त्याच्या विरुद्ध राजापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नं १४/२०२४ भा.द.वि.सं चे कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन आयशर टेम्पो क्रमांक MH०९-FL-5110 व १५ टन वजन असलेला खाडीतील शिंपल्यांचा कच हस्तगत करण्यात आला आहे.या गुन्ह्यातील हस्तगत मुद्देमालाचे वर्णन खालील प्रमाणे आहे. १) ₹ 10,00,000/- किमतीचा एक आयशर टेम्पो व २) ₹ 1,50,000/-किमतीचा खाडीतील शिंपल्यांचा कच असा एकूण मुद्देमाल ₹ ११५००००/- ही कारवाई, खालील नमूद पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी केलेली आहे,1) पोलीस निरीक्षक श्री. फुलचंद मेंगडे, राजापूर पोलीस ठाणे,2) पो.ना/८१२ श्री. सचिन वीर, 3) पो.कॉ/427 श्री. पंकज साटविलकर, 4) पो.कॉ/09 श्री. अनिल केसकर व 5) चालक पो.कॉ/713 श्री. अर्शद मुल्ला.www.konkantoday.com