
*रत्नागिरी शहरानजीकच्या जुवे मळी येथील आंबा बागेत 24 वर्षीय नेपाळी तरुणीची ओढणीने गळफास घेऊन केली आत्महत्या*
____रत्नागिरी शहरानजीकच्या जुवे मळी येथील आंबा बागेत नेपाळी तरुणीने ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली.सुमन लालवीर बिका (24,रा.मुळ रा.नेपाळ सध्या रा.जुवे,रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.सुमन बिका ही जुवे मळी येथील चव्हाण यांच्या आंबा बागेत कामाला होती.रविवारी सायंकाळी तीने अज्ञात कारणातून बागेतीलच एका आंब्याच्या झाडाला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली.ही बाब तेथील इतर कामगारांच्या निदर्शनास येताच त्यांनी गावातील इतर नागरिकांच्या मदतीने तिने फास लावलेली ओढणी कोयतीने कापुन खाली उतरवून खाजगी गाडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले.तेथील वैद्यकिय अधिकार्यांनी सुमनला तपासून मृत घोषित केलेwww.konkantoday.com