*महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ३८ रेल्वेगाड्या भाविकांना घेऊन अयोध्ये कडे जाणार*
___महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ३८ रेल्वेगाड्या श्रीरामाचे दर्शन करण्यासाठी कार्यकर्त्यांना घेऊन अयोध्येकडे निघाल्या आहेतछत्रपती शिवाजी टर्मिनसवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. भाजपने राममंदिराचे दर्शन घडवून आणण्याचा शिस्तशीर कार्यक्रम तयार केला आहे. एकेका गाडीतून १४०० रामभक्त अयोध्येकडे निघतील. या सर्वांना अयोध्येचे दर्शन घडवून परत आणण्याचा कार्यक्रम लोकसभा मतदारसंघानिहाय निश्चित करण्यात आला आहे.७ मार्चपर्यंत हे दर्शन पर्यटन सुरू राहणार आहे. नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, गोंदिया अशा रेल्वेस्थानकांवरून या गाड्या निघतील. प्रत्येक भाविक रेल्वेला विशिष्ट शुल्क देणार आहेत. अयोध्येतील निवास, दर्शन यांची सोय पाहण्याची जबाबदारी संजय पांडे सांभाळत आहेत.www.konkantoday.com