*भारतात 55 कोटी ऑनलाईन गेमर्स!*
___नवी दिल्ली : देशातील विविध हायकोर्टांत दाखल झालेल्या शपथपत्रांनुसार, देशातील गेमिंग कंपन्यांच्या प्लॅटफॉर्मवर 55 कोटींहून अधिक लोक गेम खेळत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.नशीब, कौशल्य असे अनेक तर्क या गेमिंग प्लॅटफॉर्मबद्दल संबंधित कंपन्यांकडून अनेक तर्क दिले जात असले तरी या गेमिंगमुळे, विशेषत: क्रिकेट ऑनलाईन गेमिंगमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक सेलिब्रिटीज या ऑनलाईन गेमिंगचे ब्रँड अॅम्बेसॅडर आहेत. त्यांच्यावरही कायदेशीर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी विविध न्यायालयांतून दाखल याचिकांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे.www.konkantoday.com