फणसवणे येथील महिला बेपत्ता*

**रत्नागिरी, दि. 6 : फणसवणे, लांबेवाडी, ता. संगमेश्वर येथून चांदणी चंद्रकांत सावंत (वय ४० वर्षे) या हरवल्याची नोंद संगमेश्वर पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे. सदर महिला दि.11 डिसेंबर 2015 पासून बेपत्ता आहेत. उंची ५ फूट ४ इंच, रंग निमगोरा, डोळे तिरळे, नाक सरळ, डाव्या पायाच्या घोट्याजवळ जखम, केस लांब काळे वेणी, हातात काचेच्या हिरव्या बांगड्या, गळ्यात काळ्या मण्यांचे नकली मंगळसुत्र व नकली चेन, कानात नकली झुमके, उजव्या हाताच्या मनगटावर चंद्रकांत गोंदलेले आहे. पायांत स्लीपर अंगावर सहावारी ‘काळ्या निळ्या रंगाची व फुलांची साडी व लाल रंगाचे ब्लाऊज शिक्षण इयत्ता ९ वी, सोबत रेशन कार्ड व मोबाईल (मो. नं. ७०५७३३३५४५) आहे. ही महिला कोणास आढळल्यास संगमेश्वर पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button