*फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, दुघर्टनेत 25 हून अधिक जण होरपळल्याची भीती*
__मध्य प्रदेशातील हरदामध्ये फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. या दुघर्टनेत 25 हून अधिक जण होरपळल्याची प्राथमिक माहिती आहे. फटाक्यांच्या कारखान्यात एका मागोमाग एख अनेक स्फोट झाल्याने भीषण आग लागली आहे.घटनास्थळी अग्निशामन दलाच्या अनेक गाड्या दाखल झाल्या आहेत. धुराचा लोळ आजूबाजूच्या परिसरात पसरला आहे. कारखान्यात आणखी काही कामगार अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.www.konkantoday.com