*धनेश पक्ष्याच्या वास्तव्याचे ठिकाण आता सुरक्षित झाले*
_राजापूर शहरातील मध्यवर्ती भागामील सुरंगीच्या झाडावर धनेश पक्ष्याची ढोली आढळून आली आहे. मात्र, त्या परिसरामध्ये असलेल्या तात्पुरत्या स्वरूपातील झोपड्यांमधील माणसांच्या वावरामुळे धनेश पक्ष्याच्या ढोलीतील वास्तव्यामध्ये अडचणी येत होत्या. वनविभाग, नगर पालिका आणि पक्षी मित्रांच्या पाठपुराव्यानंतर या परिसरातील झोपड्या हटविण्यात आल्याने धनेश पक्षाच्या वास्तव्यातील अडचणी आता दूर झाल्या आहेत. www.konkantoday.com