*तिवरे धरण पुनर्बांधणीसाठी ६३ कोटी*

तब्बल २२ जणांचा बळी आणि ५४ कुटुंबांच्या संसाराची राखरांगोळी करणार्‍या तिवरे धरणफुटीनंतर चार वर्षांनी धरणाच्या पुनर्बांधणीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. धरणाच्या पुनर्बांधणीकरिता एकूण ६३ कोटींच्या खर्चाला सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. धरण पुनर्बांधणीकरिता आमदार शेखर निकम यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. धरणफुटीत जेवढा भाग वाहून गेला आहे तो पूर्णपणे काढून नव्याने मातीचे काम केले जाणार आहे.२ जुलै २०१९ च्या अमावास्येच्या रात्री धो-धो कोसळणार्‍या पावसात सह्याद्रीच्या पायथ्याशी बांधले गेलेले धरण फुटले. धरणाच्या पाण्याच्या लोंढ्यात भिंतीलगत बसलेल्या भेंदवाडीतील २२ घरे, जनावरांचे गोठे आणि २२ जीव वाहून गेले. दुर्घटना घडल्यानंतर राजकीय नेतेमंडळी, मंत्री यांनी दौरे करत मोठमोठ्या घोषणा केल्या. त्यानंतर आलेल्या निवडणुकीतही त्याचा पुरेपूर वापर केला. मात्र जसजसे दिवस उलटत गेले तसतसे धरण पुनर्बांधणी रखडली. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button