
*डॉ. भास्कर जगताप जिल्हा शल्यचिकित्सकपदी*
__महाड ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप यांनाा जिल्हा शल्यचिकित्सकपदी बढती मिळाली आहे. त्यांची पदोन्नती बदली रत्नागिरी येथे झाली असून मंगळवारी रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात ते पदभार स्विकारणार आहेत. चाकोरीबाहेर जावून रूग्णसेवा देणारे वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. जगताप ओळखले जातात.डॉ. भास्कर जगताप यांनी वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधीक्षक म्हणून तीस वर्षे महाड आणि पोलादपूर तालुक्यात सेवा दिली आहे. १९९३ मध्ये ते पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून रूजू झाले. सन २००० ते २००१ या कालावधीत त्यांनी बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहिले. २००१ ते २००४ या कालावधीत मिरज वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी एम.एस. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ते २००४ मध्ये पोलादपूर ग्रामीण रूग्णालयात रूजू झाले. २००५ मध्ये महाड ग्रामीण रूग्णालयाचे पशुवैद्यकीय अधीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.www.konkantoday.com