*डम्पिंग ग्राउंड प्रकल्प रद्द झालाच पाहिजे कोत्रेवाडी ग्रामस्थांचे आंदोलन*
____नही चलेगी, नही चलेगी दादागिरी नही चलेगी, डम्पिंग ग्राउंड प्रकल्प रद्द झालाच पाहिजे अशा घोषणा देत लांजा नगरपंचायत परिसर दणाणून सोडण्यात आला.सोमवारी ५ फेब्रुवारी दुपारी बारा वाजता कोत्रेवाडी ग्रामस्थांनी डम्पिंग ग्राउंड प्रकल्प रद्द होण्यासाठी नगरपंचायतीवर आंदोलन छेडण्यात आलेलांजा नगरपंचायतीमार्फत कोत्रेवाडी येथे डम्पिंग ग्राउंड प्रकल्प प्रस्तावित आहे. मात्र हा प्रकल्प लोकवस्ती पासून अवघ्या ८० मीटर अंतरावर असल्याने येथील ग्रामस्थांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला असून या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. तरीही नगरपंचायत प्रशासनाकडून गेल्या साडेतीन वर्षांपासून कोत्रेवाडी येथील प्रकल्प प्रस्तावित जागा रद्द केलेली नाही. या साऱ्या पार्श्वभूमीवर कोत्रेवाडी ग्रामस्थांनी आज सोमवारी पाच फेब्रुवारी रोजी भाजपाचे माजी आमदार आणि लोकसभा सहप्रभारी बाळासाहेब माने यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीवर धडक मोर्चा दिला. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर ,शहराध्यक्ष गुरुप्रसाद प्रसाद तेली, नगरसेवक संजय यादव, मंगेश लांजेकर, शितल सावंत, जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना खामकरतालुका सरचिटणीस शैलेश खामकर, विराज हरमलेजिल्हा सरचिटणीस हेमंत शेट्ये तसेच तालुका पदाधिकारी विजय कुरूप, माजी शहराध्यक्ष प्रमोद कुरूप, नाना शेट्ये ,उपशाराध्यक्ष सतीश पेडणेकर, सुयोग तोडकरी आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.www.konkantoday.vom