कोंबडीच्या मागावर बिबट्या शिरला घराच्या पडवीत*

  • कोंबडीच्या मागावर बिबट्या शिरला घराच्या पडवीत शिरल्याची घटना घडली आहेचिपळूण तालुक्यातील निवळी येथील कातळवाडी येथे दि. ३१ जानेवारी रोजी पहाटे ४.१० वाजण्याच्या सुमारास जयराम रा. मोरे यांचे घराच्या मागील बाजूस असलेल्या पडवीमध्ये बिबट्या शिरला होता.*याबाबतची माहिती पोलिसपाटील निवळी यांनी भ्रमणध्वनीद्वारे वनपाल सावर्डे यांना दिली. यानुसार वन विभागाचे वन्यप्राणी बचाव पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकामधील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली असता हा बिबट्या हा कोंबड्याच्या वासाने राहत्या घराच्या मागील बाजूस असलेल्या (पडवी) खोलीमध्ये बसला असल्याचे दिसून आले. या खोलीच्या दरवाजाच्या अर्ध्याभागावर लाकडी फळ्या व पत्र्याने बंद करून दारासमोर पिंजरा लावून बिबट्याला सुखरूप जेरबंद करण्यात वन अधिकाऱ्यांना यश आले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button