
जितेंद्र आव्हाड हा अत्यंत घाणेरडा माणूस’ -हसन मुश्रीफ
*__अजित पवारांनी शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरून आमदार जितेंद्र आव्हाड विरुद्ध अजित पवार असा संघर्ष पाहायला मिळत असतानाच, यात आता अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी उडी घेतली आहे.मुश्रीफ यांनी आव्हाड यांच्यावर जोरदार टीका करत, ‘जितेंद्र आव्हाड हा अत्यंत घाणेरडा माणूस’ असल्याचे म्हटले आहे.आव्हाड यांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेला उत्तर देतांना म्हटले आहे की, “जितेंद्र आव्हाड हा अत्यंत घाणेरडा माणूस आहे. केवळ अजित पवार यांच्यावर टीका करत राहणं एवढंच त्याचं काम आहे. आता ठाण्यामध्ये जी घटना घडली त्याच्यावर ते का बोलत नाही. याचा उत्तर जितेंद्र आव्हाड यांनी मला द्यावे. केवळ अजित पवारांवर बोलत राहणं एवढंच त्यांचं काम आहे. अजित पवार यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ जितेंद्र आव्हाड यांनी लावला असल्याचे देखील मुश्रीफ म्हणाले आहेत.www.konkantoday.com