*चिपळूण एसटी डेपोचे* *काम बेकायदेशीरपणे सुरू,**माजी नगरसेवक मोहनशेठ मिरगल यांचा आक्षेप*
___गेल्या पाच वर्षापासून रखडलेल्या आणि सध्या सुरू असलेल्या चिपळूण मध्यवर्ती बस स्थानकाच्या नव्याने उभारणीच्या कामाला सुरूवात झाली असली तरी पुन्हा एकदा हे काम अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चिपळूण नगर पालिकेच्या दुर्लक्षामुळे बेकायदेशीरपणे हे काम सुरू असून याबाबत माजी नगरसेवक मोहनशेठ मिरगल यांनी आक्षेप घेत न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे.चिपळूण शहरातील मध्यवर्ती एसटी बस स्थानक नव्याने बांधण्याच्या कामाला २३ फेब्रुवारी २०१८ रोजी चिपळूण नगर परिषदेच्या बांधकाम विभागाकडून परवानगी देण्यात आली. या वेळी काही अटी आणि शर्थी घालण्यात आल्या होत्या. परंतु या अटी आणि शर्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. अट क्रमांक चारमध्ये एक वर्षाच्या आत ठरल्याप्रमाणे काम झाले नाही, तर परवाना रद्द केला जावू शकतो, असे नगर पालिकेने कळवले होते. २२ फेब्रुवारी २०१९ रोजी वर्षभराची मुदत संपली आहे. वाढीव मुदत अद्यापही एसटी महामंडळाने अथवा ठेकेदाराकडून घेतली गेलेली नाही. मंजूर नकाशाप्रमाणे पायाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर कार्यलयाला कळविणे अपेक्षित होते, प्लिथं चेकींग व अन्य तपासण्या केल्यानंतर पुढील बांधकाम करण्याची अट होती, मात्र तेही नगर पालिकेने अद्याप पाहिलेले नाही.www.konkantoday.com