*चिपळुणात गॅस पाईपलाईनसाठी खोदलेले रस्ते पूर्ववत करण्याची मागणी*
____चिपळूण शहरात अशोका गॅस सर्व्हिसेस एजन्सीकडून गॅस कनेक्शनकरिता रस्ते उकरून, फक्त माती तशीच ओढून ठेवली जात आह. मात्र रस्ते पूर्वीप्रमाणे डांबरीकरण करण्याची उपाययोजना नाही, याचा नागरिकांना त्रास होत असल्याने रस्ते पूर्ववत डांबरीकरण करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक सावर्डेकर यांनी मुख्याधिकार्यांकडे केली आहे.अशोका गॅस सर्व्हिसेसकडून पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा देण्याकरिता शहरातील व अंतर्गत रस्ते जवळपास चार फूट खोदले जात आहेत. ते बुजवून पूर्ववत करण्याची जबाबदारी न स्वीकारता फक्त खोदलेल्या ठिकाणी माती ओढली जात आहे. सदरची पूर्तता, रस्ता डांबरीकरण वगैरे बाबी नगर परिषद करेल. त्याची रक्कम आम्ही नगर परिषदेकडे पूर्वीच भरणा केलेली आहे, असे त्यांच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले. जर सदर रक्कम नगर परिषदेकडे पूर्वीच भरणा झाली असल्यास काम चालू करण्यापूर्वीच त्या टेंडर व वर्क ऑर्डर निघणे गरजेचे होते व त्या नंतर रस्ते खोदण्यास परवानगी देणे गरजेचे होते. याबाबी वेळेपूर्वी झालेल्या नाहीत.www.konkantoday.com