*खवले मांजराची तस्करी, आणखी एकाचा सहभाग*
_मुंबई-गोवा महामागांचे भरणे येथे काळकाई मंदिरासमोर खवले मांजराच्या तस्करीप्रकरणी वनविभागाच्या पथकाने गजाआड केलेल्या तीनही संशयितांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी एकाचा सहभाग असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले असून वनविभागाचे पथक त्याच्या मागावर असल्याचे समजते. लवकरच त्याच्याही मुसक्या आवळण्यात येतील, असे सांगण्यात आले. तोच खवले मांजर तस्करीप्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याची माहिती देखील उपलब्ध झाली आहे.भरणे येथील काळकाई देवी मंदिरासमोर एक व्यक्ती खवले मांजराची खवले घेवून येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाने रचलेल्या सापळ्यात आतिश अशोक सोनावणे (तुळशी बुद्रूक बौद्धवाडी) यास खवले मांजरासह रंगेहाथ पकडण्यात आले होते. सखोर तपासाअंती आणखी दोघांचा सहभाग असल्याचे उघड झाल्यानंतर वनविभागाच्या पथकाने तुळशी खिंडीजवळ पुन्हा सापळा रचून अनिल धोंडीराम जाधव (नागाव-महाड, जि. रायगड) राजेंद्र रघुनाथ मोरे (दिवीळ-पोलादपूर, जि. रायगड) यांना जेरबंद केले होते.www.konkantoday.com