
*उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांनी केला वंदे भारत एक्सप्रेस ने मुंबईचा परतीचा प्रवास*
___कोकण दौऱ्यावर आलेले शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी परतीचा प्रवास वंदे भारत एक्सप्रेस ने केलाशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह कोकण दौऱ्यावर होते. चिपळूण येथील सभेनंतर मुंबईला परत येताना ठाकरेंनी रेल्वे मार्गाने परत येणे पसंत केले. ठाकरेंनी वंदे भारत ट्रेनने खेड ते मुंबई प्रवास असा सपत्नीक प्रवास केला.वंदे भारत या सेमी हायस्पीड ट्रेनने उद्धव ठाकरे-रश्मी ठाकरे यांनी खेडहून मुंबई गाठली. यावेळी प्रवासात त्यांच्यासोबत पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार विनायक राऊत आणि इतर पदाधिकारी सोबत होते. दरम्याने वंदे भारत मधील प्रवाशांनी देखील उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली ठाकरेंच्या रेल्वे प्रवासाचे फोटो सोशल मीडियावर अल्पावधीतच व्हायरल झाले. www.konkantoday.com