
दापोली मध्ये कावळे मृतावस्थेत सापडल्याने खळबळ
सध्या देशाच्या विविध भागात बर्ड फ्ल्युची साथ पसरली आहे महाराष्ट्रात अद्यापही ही साथ आली नसल्याचे आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आलेआहे बर्ड फ्लू हा पक्षां मार्फत पसरणारी साथ आहे त्यामुळे सर्वत्र काळजीचे वातावरण असतानाच दापोली मध्ये पाच कावळे मृतावस्थेत आढळून आले हे कावळे नेमके कशामुळे मृत्यू पावले त्यासाठी आता पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कडे नमुने सोपवण्यात आले आहेत त्याचा अहवाल आल्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होणार आहे मात्र अशा प्रकारे कुठेही मृत पक्षी आढळल्यास संबंधित यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहेसध्या तरी महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यूची साथ नसल्याचेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे
www.konkantoday.com