कोकण मार्गावर ९ रोजी मेगाब्लॉक___
कोकण मार्गावरील आडवली-आचिर्णे विभागादरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी ९ फेब्रुवारी रोजी अडीच तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता सुरू होणारा मेगाब्लॉक सकाळी १०.३० वाजता संपुष्टात येईल. या मेगाब्लॉकमुळे दोन रेल्वे गाड्यांच्या सेवांवर परिणाम होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने रविवारी सायंकाळी जाहीर केले.या मेगाब्लॉकमुळे १०१०६ क्रमांकाची सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेस ९ रोजी सावंतवाडी-कणकवली विभागादरम्यान १ तास ३० मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे.१२०५१ क्रमांकाची सीएसएमटी मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस ९ रोजी रत्नागिरी स्थानकावर १० मिनिटांसाठी रोखण्यात येणार आहे. या बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.www.konkantoday.com