
शिक्षकाच्या निवृत्ती समारंभात विद्यार्थ्यांसह अख्खे गाव रडले!*
*_निर्व्हा पूर्ण प्राथमिक केंद्रीय शाळा नं. १ चे निवृत्त अपंग शिक्षक अशोक धनावडे यांनी तब्बल २८ वर्षे एकाच शाळेत प्रामाणिकपणे सेवा केली. त्यामुळे त्यांचा नुकताच माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत भव्यदिव्य कार्यक्रमात गौरव केला. आता धनावडे गुरूजी शाळेत येणार नसल्याने या कार्यक्रमात अख्खे गाव रडले.एकीकडे विद्यार्थ्यांअभावी मराठी शाळा बंद पडत असतानाच अशाच मराठी शाळेतील शिक्षकाचा भव्यदिव्य निवृत्ती समारंभ नव्हे तर साधा समारंभही होणे तसे दुर्मिळच. मात्र या परिस्थितीला छेद देणारा कार्यक्रम निर्व्हाळा गावात साजरा झाला. अपंग तेही तब्बल २८ वर्षे सेवा बजावून निवृत्त झालेल्या अशोक धनावडे यांचा माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत गौरव केला. www.konkantoday.com