
विठू माऊलीच्या मूर्तीचे आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते अनावरण*
*_महाराष्ट्र शासनाच्या ‘सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत रत्नागिरी नगर परिषदेच्या शिर्के उद्यान सुशोभीकरण करणे’ या विकास कामाचा लोकार्पण सोहळा माननीय नामदार श्री उदयजी सामंत साहेब मंत्री (उद्योग) महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रत्नागिरी व रायगड जिल्हा यांच्या शुभहस्ते दि.05/02/2024 रोजी सायंकाळी 6:00वाजता पार पडणार आहे. तत्पूर्वी दुपारी 3:00 वाजता मारुती मंदिर येथून वारकरी दिंडींचा चा प्रारंभ होणार असून पुढे हॉटेल विवेक च्या प्रांगणात रत्नागिरीतील पहिले माऊलींच्या अश्वांचे गोल रिंगण सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे त्यात समस्त वारकरी दिंड्या, भजनी मंडळ , महिला मंडळ, रत्नागिरीतील नागरीक सहभागी होणार आहेत..गोल रिंगण कार्यक्रम आटोपल्यानंतर समस्त दिंड्या शिर्के उद्यान येथील कार्यक्रम स्थळी ह.भ. प. बापु महाराज देहुकर यांचे कीर्तन सोहळ्यास उपस्थीत राहणार आहेत तदनंतर विठू माऊलीच्या मूर्तीचे अनावरण मा. ना. श्री उदयजी सामंत , मंत्री (उद्योग) महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रत्नागिरी व रायगड जिल्हा यांचे हस्ते होणार आहे .. विठू माउली मूर्तीचे अनावरण झाल्यानंतर महिला भजनी मंडळ हरिपाठ म्हणणार आहेत आणि हरिपाठ कार्यक्रम नंतर कार्यक्रमाची सांगता होणार आहे.. या अभूतपूर्व सोहळ्यांसाठी रत्नागिरी करांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन नगरपरिषद प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.www.konkantoday.com




