रत्नागिरी जिल्ह्यात दहा वर्षात ८२ बिबट्यांचा मृत्यू
* रत्नागिरी जिल्ह्यात नैसर्गिक साखळीतील प्रमुख प्राणी असलेला बिबट्या सध्या संकटात सापडला आहे. कारण वन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार २०१३ ते २०२३ या १० वर्षात जिल्ह्यातील विविध तालुक्यात मिळून एकूण ८२ बिबट्यांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. विस्मयकारक गोष्ट म्हणजे बिबट्याचे सर्वाधिक मृत्यू हे परिमंडळ (वन) संगमेश्वर देवरूखमध्ये झालेले आहेत. त्यामुळे बिबट्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.वन विभाग रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार २०१३ ते २०२३ या वर्षात एकूण ८२ बिबट्यांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला आहे. तसेच या दहा वर्षाच्या काळात वन विभागाने एकूण ६९ बिबट्यांना नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरित्या सोडले आहे. बिबट्यांचे सर्वाधिक मृत्यू हे अज्ञात वाहनाच्या धडकेने आणि फासकीत अडकून झालेले आहेत. तसेच बहुतांश मृत्यू हे नैसर्गिक कारणाने झाले असल्याचे वन विभागाकडून प्राप्त माहितीतून स्पष्ट झाले आहे.www.konkantoday.com