*मारुती मंदिर ते जेलनाका आज एकदिशा मार्ग सर्व वाहनांना प्रवेश बंद*

*रत्नागिरी, दि. 5 (जिमाका) :श्री विठ्ठल मूर्तीच्या अनावरणासाठी सुमारे तीन हजार वारकरी येणार असून त्यांची दिंडी मारुती मंदिर ते शिर्के उद्यान, माळनाका अशी होणार आहे. या दिंडीकरिता वाहतुकीची कोंडी होवू नये म्हणून आज 2 ते 5 वाजेपर्यंत मारुती मंदिर ते जेलनाका दरम्यान एकदिशा मार्ग सर्व वाहनांना बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी काल रात्री दिले आहेत. या आदेशात म्हटले आहे, रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील तारांगणा शेजारील शिर्के उद्यानाचे सुशोभिकरण करणे या विकास कामाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज होत आहे. श्री विठ्ठल मूर्तीच्या अनावरणासाठी सुमारे 3 हजार वारकरी येणार आहेत. त्यांच्या दिंडीकरिता वाहतुकीची कोंडी होऊ नये याकरिता दुपारी 2 ते 5 दरम्यान मारुती मंदिर ते जेलनाका वाहनाना एकदिशा मार्ग असा वाहतुकीसाठी बंद करण्याबाबत रत्नागिरी नगरपरिषदेकडून पत्र प्राप्त झाले आहे. या मार्गात पर्यायी मार्ग म्हणून परटवणे मार्गे साळवी स्टॉप असा उपलब्ध आहे. वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता व कोणताही अनुचित प्रकार घडू नये या करिता 5 फेब्रुवारी रोजी मारुती मंदिर ते जेलनाका दरम्यान एक दिशा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात यावा. वाहतुकीची कोंडी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता योग्य नियोजन करण्यात यावे. वाहतूक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी यादृष्टीने मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 116 प्रमाणे वाहतुकीची चिन्हे उभारण्याची कार्यवाही पोलीस विभागाने करावयाची आहे, असेही आदेशात नमूद आहे, असे आदेशात म्हटले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button