*बीजेपी म्हणजे भेकड जनता पार्टी, बाहेरची जनता पार्टी, बेडूक जनता पार्टी, भाड्याची जनता पार्टी, भ्रष्टाचारी जनता पार्टी, – रत्नागिरीच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी केले भाजपच्या नव्या नावाचे बारसे
मी महाराष्ट्र आता पूर्ण फिरतो आहे, फिरणार आहे. या फिरण्यामध्ये यात्रा किंवा मोठा दौरा असा काहीही आयोजित केलेला नाही. तुम्ही माझे कुटुंबीय आहात आणि या कुटुंबियांना भेटण्यासाठी मी आलेलो आहे.दोन दिवस रायगडमध्ये होतो. कालपासून या मतदारसंघाचा दौरा सुरू केला. करता करता आज तुमच्याकडे आलो आहे. पुढे चिपळूणमध्ये जायचं आहे. साहजिकच आहे मध्ये मध्ये जे काही दगड धोंडे येत आहेत. त्या दगड धोंड्यांना ओलांडूनच पुढे जावं लागेल. म्हणजे राजनच्या मतदार संघातून आता एकाच्या पेकाटात लाथ घालायला आलो आहे. हे बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चालले आहेत. हे लाचार आहेत. तुम्ही 2014 साली आलात. जेव्हा बाळासाहेब होते तेव्हा तुम्ही आमच्याशी लढत होतात. 2014 साली मी म्हाडाचे चेअरमन पद दिलं होतं. आम्ही शब्द दिला होता तो आम्ही पाळला. आता म्हटलं जा आणि मंत्रीपदाची शपथ घ्या पण हे पळाले. पण नीच माणसं कशी असतात. कारण अडकवाचं आहे ना याला म्हणजे तुमचा लोकप्रतिनिधी किती भ्रष्ट आहे. त्या भ्रष्टपणात त्यांनी ज्या किंमती लावलेल्या आहेत. बाळासाहेबांची खुर्ची त्यावर बाळासाहेबांचा फोटो आहे पण बाळासाहेब जेव्हा हयात होते तेव्हा बाळासाहेबांनी मोदींची खुर्ची वाचवली नसती तर ती त्यांना कधीच मिळाली नसती. त्या खुर्चीची किंमत हे नतद्रष्ट लावत आहेत. बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत मोदींना जाऊन विचारा आणि मोदींना जर जाण असेल तर मोदी त्या खुर्चीची किंमत सांगतील. कारण त्या खुर्चीची किंमतच होऊ शकत नाही.अटलजी जेव्हा पंतप्रधान होते आणि जे काही घडलं होतं. तेव्हा अटलजींनी सांगितलं होतं राजधर्म का पालन करना होगा. म्हणजे अडवाणींना आता भारतरत्न दिलं. नशीब आठवणीत राहिले. नाहीतर सगळ्यांना दूर करून मी म्हणजेच एकटा. मी म्हणजेच देश, मी म्हणजेच सगळं काही अशी काहीजणांना एक फरफरी आलेली आहे. अटलजींनी तेव्हा ठरवलं होतं राजधर्माचं पालन म्हणजे गुजरात मध्ये जे काही घडलं होतं किंवा घडवलं होतं. ते वाजपेयी यांना मान्य नव्हतं आणि वाजपेयी यांना काढून फेकून द्यायला निघाले होते. तेव्हा त्याच खुर्चीत बसलेल्या बाळासाहेबांना अडवाणींनी सांगितलं होतं. मोदी गया तो गुजरात गया त्या खुर्चीची तुम्ही किंमत करताय. महाराजांच्या खुर्चीची किंमत 5 हजार रुपये पण अशा किती मूर्त्या आहेत पण त्या कशासाठी करतो आहे. काय आहे असं महाराजांमध्ये, का महाराजांचीच मूर्ती करतोय कारण महाराज जन्माला आले नसते तर काय आपलं झालं असतं आणि या देशाचं काय झालं असतं. मोदींना राममंदिर बांधता आलं असतं का? राम मंदिराचा निकाल कोर्टाने दिला पण त्याचं श्रेय हे घेत आहेत.भर पोलीस स्टेशनमध्ये भाजपचा आमदार गोळीबार करतो आहे. का करावा लागला त्याला गोळीबार म्हणजे कमळाबाई पुढे हे असे हतबल नाही झालेले पूर्ण संपले आहेत. बीजेपी म्हणजे बाहेरची जनता पार्टी असं आता त्याचं नाव झालेलं आहे. मी त्यांना आता किती नावं ठेवू? भेकड जनता पार्टी, बाहेरची जनता पार्टी, बेडूक जनता पार्टी, भाड्याची जनता पार्टी, भ्रष्टाचारी जनता पार्टी, गुगारी जनता पार्टी हे यांचं राम राज्य. हे असे मकाऊला जाऊन जुगार खेळत आहेत. काही दिवसापूर्वी झालेला परदेश दौरा खासगी दौरा होता तर त्याची माहिती द्या. काही कंपन्या इथल्याच होत्या. तिथे नेऊन करार केले. सगळं गुजरातला ओरबाडून नेत आहात. गुजरात विरूद्ध मला द्वेष नाही. गुजराथ्यांविरूद्ध मला द्वेष नाही पण गुजरात विरुद्ध भारत असं चित्र जे उभं केलं जात आहे ते घातक आहे.www.konkantoday.com