*ज्या बाळासाहेबांनी त्यांना त्यांच्या संकटकाळात मदत केली त्या बाळासाहेबांची चोरी केली.चोराला मदत केली- उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधानांवर आरोप*
__जोपर्यंत संधी मिळाली आहे तोपर्यंत गोडीगुलाबीत आनंदाने भोगा. पंतप्रधानांना मी अजूनही शत्रू मानत नाही. ते मला मानतायेत. कारण त्यांनी आपली शिवसेना फोडली, ज्या बाळासाहेबांनी त्यांना त्यांच्या संकटकाळात मदत केली त्या बाळासाहेबांची चोरी केली.चोराला मदत केली. त्याला मुख्यमंत्री बनवलं. तिकडे नीतीश कुमारांना फोडले. हेमंत सोरेनला तुरुंगात टाकलं. केजरीवालांच्या मागे लागले. माझ्या राजन साळवी, रवींद्र वायकर, किशोरी पेडणेकर, सूरज चव्हाण, अनिल परब आहेत त्यांना त्रास दिला जातोय. असं आम्ही तुमची लफडी काढली, आता ते येतायेत आमच्याकडे, त्यांच्यावर कारवाई करणार की नाही असं उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना विचारले आहे. राजापूर तालुक्यातील जवाहर चौकात उद्धव ठाकरेंची जनसंवाद सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे म्हणाले की, सब का साथ म्हणजे भ्रष्टाचारांची साथ आणि मेरे दोस्तो का विकास ही नवी घोषणा भाजपाने द्यावी. लोकांनी डोक्याने विचार करावा. विनायक राऊतांना लोकांनी दोनदा निवडून दिले नाहीतर इथेही गुंडागर्दी वाढली असती. आता पंतप्रधानांसमोर प्रश्न आहे की, गद्दार, गुंड घराणेशाहीला तुम्ही रोखणार आहे की नाही. हे या निवडणुकीत कळेल. मी लढायला तुमच्यासाठी उभा आहे. जातपात धर्म, मुस्लीम, ख्रिश्चन माझ्यासोबत येतात. देशप्रेमी म्हणून एकत्र येऊया. देशावर जे संकट येतंय ते गाडून टाकूया असं त्यांनी सांगितले. तसेच मी माझं सांगण्याचं काम करतोय. देशभरात सरकारच्या कारभाराचे चटके बसतायेत. तरीदेखील मूळ मुद्दे बाजूला ठेऊन एक वेड पांघरायचं, त्यातून सगळ्यांना वेडं करायचे आणि पुन्हा सत्तेत यायचं. असा आरोप ठाकरे यांनी केलाwww.konkantoday.com