चिपळुणात जिल्हा अजिंक्य निवड चाचणी कबड्डी स्पर्धा*

_संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण यांच्यावतीने रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी पुरूष व महिला गटाच्या कबड्डी स्पर्धा ७ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत सायंकाळी ५ वाजता शहरातील कै. अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुल येथे होणार आहे.जिल्ह्यातील पुरूष गटातील १८ व महिला गटातील १५ संच या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेकरिता अनेक नामवंत खेळाडू व प्रो. कबड्डीतील खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. स्पर्धेतून निवड झालेल्या पुरूष व महिला खेळाडूंचा रत्नागिरी जिल्हा संघ हा पुणे येथे १९ फेब्रुवारी रोजी होणार्‍या राज्य अजिंक्य व निवड चाचणी स्पर्धेसाठ सहभागी होणार आहे. स्पर्धा पाहण्यासाठी जवळपास १० हजार क्रीडारसिक उपस्थित राहतील, अशी माहिती आयोजकांकडून सांगण्यात आली आहे.संपूर्ण क्रीडा मंडळाचे अध्यक्ष व माजी राष्ट्रीय खेळाडू सचिन कदम यांचे नेतृत्वाखाली स्पर्धा होत आहे. शिवाय चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे व कर्मचारी यांचे सहकार्य लाभत आहे. स्पर्धेप्रसंगी अनेक राजकीय नेते व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू भेट देणार आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button