*आजपासून रत्नागिरी-चिपळूण जलद एसटी फेरी*
_रत्नागिरी-चिपळूण या मार्गावर जलद एसटी फेरी आज ५ फेब्रुवारीपासून सोडण्यात येणार आहे.ही फेरी ५.४५ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी करबुडे वांद्री मार्गे संगमेश्वर चिपळूणच्या दिशेने येणार आहे. शिवाय रत्नागिरी ते जे. के. फाईल पर्यंत सर्व थांबे तसेच संगमेश्वर, तुरळ, आरवली, असुर्डे, सावर्डे, कापसाळ कॉरूनी या थांब्यावर ही फेरी थांबणार आहे. या एसटी. फेरीला सर्व सवलती लागू आहेत. ही फेरी शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टी दिवशी बंद ठेवण्यात येणार आहे.www.konkantoday.com