![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2024/02/IMG-20240205-WA0008.jpg)
*शिवराजेश्वर मंदिराला उद्धव ठाकरेंच्या हस्ते सिंहासन अर्पण*
__छत्रपतींना साजेसे असे सिंहासन मिळाले आहे. ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले, त्या महाराजांना नवे वैभव प्राप्त झाले आहे. महाराजांना साजेसे असे सिंहासन आमच्या वैभव नाईक यांनी उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचे कौतुकच आहे, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.शिवसेनेच्या वतीने सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिरात दगडी सिंहासन तयार करण्यात आले होते. या सिंहासनाचे पूजन आणि अर्पण सोहळा रविवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.www.konkantoday.com