कोकण रेल्वे वाहतूक ठप्प

अतिवृष्टीचा तडाखा कोकण रेल्वेला बसला असून दीड तास कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प आहे. कोकण रेल्वे मार्गावरील वीर-माणगाव दरम्यान घोड नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने कोकण रेल्वे ठप्प झाली आहे.
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या चार गाड्या थांबविण्यात आल्या आहेत.त्यामध्ये 50104 रत्नागिरी -दादर पॅसेंजर ही गाडी वीर स्थानकात थांबवली आहे.50105 दिवा-सावंतवाडी पॅंसेजर ही गाडी कोलाड येथे थांबविण्यात आली. 12617 एर्नाकुलम-निजामुद्दीन एक्सप्रेस करंजाडी येथे थांबविण्यात आली.10103 मांडवी एक्सप्रेस हि गाडी रोहा येथे थांबविण्यात आली. कोकण रेल्वेचे पथक घटनास्थळी जाऊन पहाणी करणार आहे. त्यानंतर वाहतूक सुरु होईल.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button