
*शिक्षणासाठी कानाकोपऱ्यातील विद्यार्थी धडपडत असल्याचे पाहून आनंद -अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर*
__ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी धडपड करीत आहे. त्यांच्या प्रयत्नांना चांगले यशही मिळत असल्याचा आनंद आहे. नवनिर्माण महाविद्यालय व्यवसाय शिक्षणातून विद्यार्थी घडवित आहे ही गोष्ट अभिमानास्पद आहे असे प्रतिपादन मराठी अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर हिने व्यक्त केले.नवनिर्माण महाविद्यालयाच्या हॉस्पिटॅलिटी स्टडीज अँड हॉटेल मॅनेजमेंटच्यावतीने आयोजित सिनेमेनिया या थीम डिनर कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर संचालिका सीमा हेगशेट्ये, प्राचार्य संजना चव्हाण, प्रज्ञा कदम, किरण गुरव, हॉटेज मॅनेजमेंट विभागाचे भिकाजीराव बेहरे आदी मान्यवर उपस्थित होते.शिक्षणातून पुढे जाण्यासाठी काना कोपऱ्यातुन विद्यार्थी विचार करीत असल्याचे पुढे बोलताना वैष्णवी कल्याणकर म्हणाली. या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेऊन हा कार्यक्रम पूर्णत्वास नेला. या थीम डिनर कार्यक्रमात मनोरंजनासाठी जुन्या आणि नवीन हिंदी नृत्य व गाण्यांचा समावेश होता. विद्यार्थी व शिक्षक तसेच उपस्थित पाहुण्यांनी देखील विविध अभिनेते आणि अभिनेत्रींची वेशभुषा करून या कार्यक्रमास उपस्थित राहिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कू. इशिका शेरे व प्रा. सुरज जाधव यांनी केली तसेच क्रायक्रमाचे चवदार चविष्ट मेजवानी साठी हॉटेल मॅनेजमेंट चे प्रा. मितेश पवार यांनी खूप मेहनत घेतली.www.konkantoday.com