रत्नागिरी मधील कुवारबाव बाजारपेठेत रात्री लागली अचानक आग

अ‍ॅड बंटी वणजू, बिपीन बंदरकर, परिमल खेडेकर मिलिंद दळी, व सहकारी तरुणांच्या सतर्कतेमुळे आग आली आटोक्यात

==================================
*शनिवार दिनांक ३ फेब्रुवारी रात्री १२:३०च्या दरम्यान भैया भोंगले यांची मालकी असलेल्या गळ्यांमधील एका ब्युटीपार्लरच्या गळ्याला आग धुमसत असताना पानवळकडुन गणपती कारखान्यातून रत्नागिरीकडे येणाऱ्या अ‍ॅड बंटी वणजू, परिमल खेडेकर, नितीन रोडे, सुमित संसारे यांना दिसली पण सुरवातीला गाळ्याच्या पाठून आग दिसल्याने ती शेकोटी असेल म्हणुन पुढे निघालेल्या या तरुणांनी गाडी पुन्हा वळवून चिपळूण नागरी पतसंस्थेच्या बाजूच्या रोडनी आत जाऊन पाहिले असता खरच गाळ्याला आग लागलेली दिसली चिपळूण नागरी मध्ये कामाला असलेल्या विजय कळंबटेनीही धावत आग लागली आहे याला दुजोरा दिला तेवढ्यात आग भडकली आणि ती पोल पर्यंत पोहोचली पोल ची वायर गाडीच्या समोर खाली पडूनही जीवाची पर्वा न करता अ‍ॅड बंटी वणजूनी गाडी हायवे वर आणून पहिला बिपीन बंदरकर यांना फोन करून फायरब्रिग्रेड पाठवा कुवारबाव बाजारपेठेत आग लागली आहे असे सांगितले घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बिपीन बंदरकरनी ताबडतोब एम. आई. डी. सि. आणि नगरपालिकेलाही कळविले तो पर्यंत शहर पोलीस स्थानक आणि ग्रामीण पोलीस स्थानक येथेही अ‍ॅड बंटी वणजू आणि टीमने कळविले, एम.एस.ई.बि. ला सुद्धा तात्काळ वीज पुरवठा खंडित करण्यासाठी कळविण्यात आले तो पर्यंत एम. आई. डी. सी. आणि नगरपालिकेचे पाण्याचे बंबही बाजारपेठेत हजर झाले , पोलीसही हजर झाले ताबडतोब जीवाची परवान करता एम.आई. डी. सी. आणि नगरपालिकेच्या फायर फायटरनी आग विझवायला सुरवात केली तो पर्यंत भैया सामंत ही तेथे पोहोचले माजी सरपंच राजू तोडणकर,भैया भोंगले, विजय खेडेकर, संतोष कदम, जितू शेट्ये,ओंकार मोरे आणि बहुसंख्य नागरिकही मदतीला धावले आणि काही क्षणात आग आटोक्यात आली आणि सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला जर अ‍ॅड बंटी वणजू, बिपीन बंदरकर, परिमल खेडेकर मिलिंद दळी, नितीन रोडे, सुमित संसारे,विजय कळंबटे, पोस्टाचे लिंगायत हे वेळेत तिथे पोहोचले नसते आणि वेळेवर मदत आली नसती तर आज कुवारबाव बाजारपेठेतील आग वाढून ती संपूर्ण बाजारपेठेत पोहोचली असती हे सर्व जय शंभोनारायण,भैरी, नवदुर्गा,मारुतीराया आणि पानवळ येथील गणपतीच्या कारखान्यात माघीगणेशोत्सव साठी आणण्यात येणाऱ्या गणपतीची कृपा म्हणुन आम्हाला आग लागलेली निदान कळली आणि पुढील अनर्थ टळला असे अ‍ॅड बंटी वणजूनी सांगितले

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button