
महाराष्ट्रातही काही भागात तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज
आज वायव्य भारताला ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा सामना करावा लागेल. त्यामुळे काही भागात पावसाची शक्यता असल्याचं आयएमडीने म्हटलं आहे.भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, आज पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्लीमध्ये सकाळच्या वेळी दाट ते अत्यंत दाट धुके दिसण्याची शक्यता आहे. त्यासोबत काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातही काही भागात तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, वीकेंडच्या पावसानंतर देशात थंडीचा जोर वाढण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
www.konkantoday.com