*थांबा…आमचेही दिवस येतील. तेव्हा हे सर्व व्याजसह पूर्ण फेडू. व्याजसह नाही तर चक्रवाढ व्याजसह फेडू,*-*उद्धव ठाकरे*
___महाराष्ट्रात घडलेल्या सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे हे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले आहेत. सावंतवाडी येथील गांधी चौकात पार पडलेल्या ‘जनसंवाद’ सभेत ठाकरे यांनी संवाद साधत कोकणच्या भविष्याचा विचार मांडला.याचवेळी त्यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. “मोदीजी तुमच्या पिलावळीने जर देशाचे काम केलं असतं तर पक्ष फोडाफोडीची वेळ तुमच्यावर आली नसती” असं म्हणत हल्लाबोल केला आहे.”मोदीजींना मला एकच सांगायचंय की, मोदीजी आम्ही तुमचे शत्रू कधीच नव्हतो, नेहमी सोबतच होतो. शिवसेना तुमच्या सोबत होती. गेल्याही वेळेस आम्ही युतीचा प्रचार केला. तुम्ही आम्हाला दूर टाकलत. आज देखील आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. सोडू शकत नाही. भगवा झेंडा कायम आमचाच आहे. पण या भगव्या झेंड्यात छेद मारण्याचं काम भाजपा करतंय.”मोदी साहेब ही जी तुमची पिलावळ आहे त्यांनी आजपर्यंत जर देशाचं काम केलं असतं तर ही पक्ष फोडाफोडीची वेळ तुमच्यावर आली नसती. लोकांनी पुन्हा तुम्हाला डोक्यावर घेऊन निवडून दिलं असतं” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी खोचक टोला लगावला आहे.”प्रधानमंत्री निसर्ग, तौक्ते चक्रीवादळात आले नाही, महाराष्ट्राला संकटात पैसा दिला नाही. पण महाराष्ट्र संकटात ताकदीने उभा राहतो आणि देशालाही उभा करतो. दुष्काळात तेरावा महिना असलेलं हे मोदी सरकार आपल्याला नको” असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.यावेळी आमच्यासोबत येणाऱ्यांना त्रास दिला जात आहे. त्यांना विविध प्रकारच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. परंतु थांबा…आमचेही दिवस येतील. तेव्हा हे सर्व व्याजसह पूर्ण फेडू. व्याजसह नाही तर चक्रवाढ व्याजसह फेडू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेला दिला.www.konkantoday.com