प्रश्नाची उत्तरे दिली नाहीत म्हणून विद्यार्थीनीला मारहाण, सिंधुदुर्गात शिक्षकावर गुन्हा दाखल*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कसवण येथील शाळा क्रमांक २ मधील एका तिसरी इयत्तेतील १० वर्षीय शाळकरी मुलीला मारहाण केल्याप्रकरणी शिक्षक किशोर बाळकृष्ण गोसावी याच्यावर कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित शाळकरी मुलीला शाळेत विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे शिक्षक किशोर गोसावी याने त्या पीडित मुलीच्या पायावर व पाठीवर लाकडी छडीने मारहाण केली. अशी तक्रार त्या पीडित मुलीच्या पालकांनी दिली आहे. ही घटना , बुधवार दि. ३१ जानेवारी रोजी घडल्याचे म्हटले आहे. www .konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button