- युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत सन २०२४-२५ साठी केंद्र सरकारने मराठा शासन कातळातील लष्करी दृष्टीने महत्वाच्या मानल्या जाणार्या १२ किल्ल्यांचे मानांकन केले आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सुवर्णदुर्गचा समावेश आहे. यापूर्वी कातळ शिल्पांमुळे रत्नागिरीचे नाव जागतिक पातळीवर गेलेले असताना आता सुवर्णदुर्गमुळे पुन्हा एकदा रत्नागिरीचे नाव जागतिक पातळीवर जाणार आहे.मराठा मिलिटरी लँडस्केप्स ही मराठा शासकांनी कल्पना केलेली असाधारण तटबंदी आणि लष्करी व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करते, जे भारताच्या ज्वलंत इतिहासाचे प्रदर्शन करते. या मानांकनाचे बारा घटक किल्ला, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूमधील गिनीचा किल्ला अशा किल्ल्यांचा समावेश आहे. www.konkantoday.com
Back to top button