रेल्वे ट्रॅकवर पडून मृत झालेल्या तरूणाची ओळख पटली*
___संगमेश्वर ते उक्षीदरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर अज्ञात तरूणाचा रेल्वेमधून प्रवास करत असताना पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या तरूणाची ओळख पटवण्याचे काम संगमेश्वर पोलीस करीत होते. अखेर या तरूणाची ओळख पटली असून रूपुस मारकुस खडिया (२४) असे या तरूणाचे नाव असून झारखंड येथील तो रहिवासी आहे.याबाबत त्याचा भाऊ पोंडू मारकुस खडिया याने खबर दिली. संगमेश्वर ते उक्षीच्या दरम्यान कोणत्यातरी ट्रेनमधून रेल्वे ट्रॅकच्या बाजूला तो पडला होता. त्याला मंगला एक्स्प्रेसने रत्नागिरी स्टेशन येथे २० जानेवारी रोजी आणले असता १०८ ऍम्ब्युलन्समधील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. www.konkantoday.com