*राज्य कबड्डी स्पर्धेसाठी गौरीज सणसची निवड*
_महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने पुणे येथे होणार्या ३४ व्या किशोर गट राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या संघात दापोलीमधील टाळसुरे येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या गौरीज सणस याची निवड झाली आहे.गौरीज सणस हा विद्यालयाबरोबरच अमर भारत क्रीडा मंडळ टाळसुरे या संघातून देखील कबड्डी खेळत आहे. सध्या तो १० वीमध्ये शिक्षण घेत असून सलग दुसर्या वर्षी जिल्हा किशोर गट कबड्डी संघात त्याचा समावेश झालेला आहे. यापूर्वी गौरीज याने अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. बक्षिसे मिळवली आहेत. www.konkantoday.com