
रत्नागिरी जिल्ह्यामधील “महिला सुरक्षा विशेष कक्ष समुपदेशने १४१ कुटुंबातील वाद मिटविण्यात यशस्वी”*.
*___रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने महिला सुरक्षा विशेष कक्ष व पोलीस ठाणे स्तरावरील महिला मदत कक्ष यांच्या मार्फत पती-पत्नी मधील वाद, विविध कुटुंबांमधील वाद, व कौटुंबिक कलह बाबत सन २०२३ मध्ये १९२ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींमध्ये पती-पत्नीचे कौटुंबिक वाद, मोबाईलचा अतिप्रमाणात वापर, एकमेकांना वेळ न देणे, एकत्र कुटुंबात न राहणे, घरातील आर्थिक व्यवहार इत्यादी कलहाची कारणे निदर्शनास आली. या प्राप्त तक्रारींमध्ये महिला दक्षता समिती व भरोसा सेल मधील सदस्यांच्या मदतीने अर्जदार व गैर अर्जदार यांना योग्य पद्धतीने समुपदेशन करून १४१ जोडप्यांमधील कलह, वाद यशस्वी रित्या संपुष्टात आणण्यात आले व त्यांचे वैवाहिक जीवन पुनर्स्थापित करण्यात यश आले आहे तसेच इतर तक्रारी हया अर्ज दिल्यानंतर कौटुंबिक स्तरावरच मिटल्या आहेत.पती-पत्नी मधील वाद तसेच महिलांचा सासरी होणाऱ्या छळ-जाचाच्या बाबत तक्रारी सामंजस्याने सोडविण्यासाठी रत्नागिरी जिल्हा स्तरावर महिला सुरक्षा विशेष कक्ष व पोलीस ठाणे स्तरावर महिला मदत कक्ष स्थापन आहेत. तरी आपले कौटुंबिक वाद टोकापर्यंत जाऊन घटस्फोटांच्या घटनांमध्ये वाढ होऊ नये व पती-पत्नी एकमेकांपासून कायमचे दुरावून त्याचा परिणाम त्यांच्या मुलांच्या भवितव्यावर होऊ नये यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून जिल्हा स्तरावरील महिला सुरक्षा विशेष कक्षाकडे किंवा आपल्या नजीकच्या पोलीस ठाण्यामधील महिला मदत कक्षाकडे मदत घ्यावी व समुपदेशन करिता तक्रारी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.www.konkantoday.com