
साईभक्ताने चक्क 5 हजार किलो केशर आंबे केले साई संस्थानला दान
देश-विदेशातील साईभक्त साई चरणी सोने, चांदी, रुपये अशा विविध स्वरूपात दान देत असतात. मात्र एका साईभक्ताने चक्क 5 हजार किलो केशर आंबे साई संस्थानला दान स्वरूपात दिले आहेत.दोन दिवस साईबाबा संस्थानच्या प्रसादालायात येणाऱ्या भाविकांना तसेच संस्थानच्या रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना आमरसा ची मेजवानी मिळणार आहे. शिर्डीसह पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर आदी धार्मिक स्थळी सदर भाविकाने केशर आंब्याचे दान दिलं आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुर येथील शेतकरी साईभक्त दिपक नारायण करगळ यांनी सेंद्रीय पध्दतीने पिकविलेले 5 हजार किलो केशर आंबे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्या श्री साई प्रसादालयात देणगी स्वरुपात दिले असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.
www.konkantoday.com