मुंबई गोवा महामार्गावर पाली नजीक दुचाकीला टँकरने मागून धडक दिल्याने एक जण ठार*

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर पाली उभी धोंड येथे वळणावर दुचाकीला टँकरने मागून धडक दिल्याने एक जण ठार व दुसरा जखमी झाला. काल रात्री ८.३० वाजता हा अपघात झाला. अपघातात मोटर सायकल चालक अमोल अशोक पवार (वय ३५) ठार झाला. प्रेम संजय पवार (वय १९) जखमी झाला. दोघेही रा. साळवी स्टॉप रत्नागिरी येथील आहेत.अपघाताची माहिती अशी – दोघेही आपली ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एम एच ०८-वाय ४९१२ वरून सांगलीहून रत्नागिरीला येत होते. ते पालीउभी धोंड येथे आले असताना मागून येणाऱ्या टँकर क्रमांक एम एच ४३ सी इ ०५०५ व) ने मोटरसायकलला मागून ठोकर देऊन अपघात केला. यात मोटरसायकल चालकाचा मृत्यू झाला. दुचाकीवरील जखमीना जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या हातखंबा येथील रुगणवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल केले.त्यातील चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. www.konkntoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button