- उद्धव ठाकरे यांना कोकण दौऱ्याआधीच मोठा धक्का बसला आहे. बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख असलेले माजी आमदार सूर्यकांत दळवी शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडणार आहेत.सूर्यकांत दळवी हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 1990 ते 2014 अशी सलग 25 वर्ष सूर्यकांत दळवी दापोली मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार होते, पण आता दळवी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करणार आहेत. 2014 साली विधानसभा निवडणुकीत पक्षातल्याच लोकांनी गद्दारी करून आपल्याला पाडल्याचा आरोप सूर्यकांत दळवी यांनी वारंवार केला होता. 2019 च्या निवडणुकीत शिवसेना नेते रामदास कदम यांचे पूत्र योगेश कदम यांना उमेदवारी दिल्यामुळे ते नाराज झाले होते.2014 च्या निवडणुकीत रामदास कदम यांनी पक्षाविरुद्ध गद्दारी करून आपल्याला पाडल्याचा आरोप सूर्यकांत दळवी यांना केला होता. 2019 पासूनच सूर्यकांत दळवी नाराज होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर मातोश्रीकडून मोठी जबाबदारी मिळेल अशी आशा त्यांना होती. दापोली विधानसभा मतदारसंघाची सर्वस्वी जबाबदारी दळवी यांचे राजकीय कट्टर विरोधक असलेले माजी मंत्री अनंत गीते यांच्याकडे सोपवल्याने दळवी यांच्या नाराजीत भर पडली. गेले काही दिवस ते उद्धव ठाकरे गटाच्या कार्यक्रमात दिसत नव्हते.www.konkantoday.com
Back to top button