
नूतनीकरण झालेल्या सावरकर नाट्यगृहात नाट्यकर्मींवर होणार सुविधांची बरसात*
_स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाच्या नुतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यात राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी नाट्यकर्मींसाठी भरघोस सुविधा जाहीर केल्या. या नाट्यगृहात होणार्या व्यावसायिक आणि हौशी नाटकांसाठी भरघोस सूट जाहीर करण्यात आली आहे. हे नाट्यगृह नाटके, व्यावसायिक कार्यक्रमांसोबतच शाळांच्या स्नेहसंमेलनासाठी दिले जाणार आहे.कित्येक वर्षे विविध समस्यांनी ग्रस्त शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाबाबतीत अनेक नाट्यरसिकांनी आणि श्रोत्यांनीही नाराजी व्यक्त केली होती. याबाबत अनेकवेळा नाट्यकर्मींकडून लोकप्रतिनिधींना तसेच नगर परिषद प्रशासनाला विनवण्या करण्यात आल्या. याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांच्या सांगण्यावरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नगरविकास विभागातून १० कोटींचा निधी विशेष कार्यासाठी मंजूर केला. www.konkantoday.com