*निधी खर्ची पडून गायब झालेल्या पॅड डिस्पोझल मशीन चा शोध जिल्हा परिषद सीओ घेणार*
___स्वच्छता अभियान देशात नव्हे तर राज्यात व गावागावात जोर धरत असताना अत्यंत महत्वाचा मात्र तेवढाच सुरक्षित असलेला सॅनिटरी नॅपकीनचा कचरा मात्र आजही गावागावात, शहरांमध्ये इतरत्र पसरलेला दिसत आहे. या सॅनिटरी नॅपकीनची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतींनी बसवायचे इन्सेंटर मात्र आता ग्रामपंचायतीतून गायब झाले आहेत. या मशीनसाठी देण्यात आलेला निधी नक्की कुठे गेला? किती ग्रामपंचायतींनी हे मशिन लावले, याची माहिती आता स्वतः जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार घेणार आहेत.२०२१ मध्ये जागतिक बँकेकडून सॅनिटरी पॅड डिस्पोझेबल मशिन खरेदी करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंंचायतींना निधी देण्यात आला होता. या योजनेंतर्गत जिल्ह्यात जिल्हा परिषदेमार्फत ८४३ ग्रामपंचायतींकडून ५९ लाख १ हजार इतका निधी वर्ग करण्यात आला होता. या निधीमधून प्रत्येक ग्रामपंचायतीने १ इन्सेंटर मशिनसाठी ७ हजार रुपये देण्यात आले होते. या निधीसोबतच ग्रामपंचायतीने स्वतःकडील निधी खर्च करून हे मशिन घेण्याबाबत निर्देश देण्यात आले. मात्र जिल्ह्यात फक्त हाताच्या बोटावर मोजता येतील, इतक्याच ग्रामपंचायतींनी हे इन्सेंटर मशीन खरेदी केल्याचे समोर येवू लागले आहेत. www.konkantoday.com