ना मुख्यमंत्रिपदाचे पडले होते ना पंतप्रधानपदाचे स्वप्न स्वप्नातही पडत नाही-**उद्धव ठाकरें*

_आम्ही लढतोय, अनंत गीतेंनी माझी पंचाईत केली. उद्धव ठाकरेंच पुन्हा मुख्यमंत्री होणार. अहो मी, पंतप्रधानपदाचे स्वप्न बघू की नको असा प्रश्न पडलाय अशी कोपरखळी उद्धव ठाकरे यांनी सभेत मांडली तेव्हा लोकही हसले.रायगडच्या पेण येथे उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेत भाजपासह स्थानिक खासदार सुनील तटकरे यांच्यावरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मला अशी स्वप्न पडत नाहीत. ना मुख्यमंत्रिपदाचे पडले होते ना पंतप्रधानपदाचे स्वप्न स्वप्नातही पडत नाही. मला फक्त दिसतोय माझा देश, माझी भारतमाता आणि या भारतमातेच्या बाजूला असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान, घटना ते आम्हाला वाचवायचं आहे. कोणालाही मतदान करायचं म्हणून मत द्यायचे नाही. हे मत तुम्ही स्वत: तुमच्या पुढच्या पिढीसाठी देणार आहात. पुढच्या पिढी भलेही तुरुंगात नाही टाकल्या तरी संपूर्ण देशाचा तुरुंग झाला तर त्या वातावरणात तुमच्या पिढीने जगावं अशी तुमची इच्छा असेल तर जरुर तुम्ही हुकुमशाहीला मतदान करा. नाहीतर इंडिया आघाडी जी देशभक्तांची आघाडी आहे तिला तुम्ही मतदान करा असं आवाहन त्यांनी केले. तसेच आज इज मी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेलो, शेकाप आपल्या सोबत आहे. अनंत गीते यांचा गेल्यावेळी पराभव झाला. परंतु मी रायगडला धन्यवाद देतो, कारण त्यावेळीही रायगड मोदीलाटेत वाहून गेला नाही. आत निवडून आलेला मोदी लाटेत गेला परंतु आमचा रायगड तिथेच आहे. आज रायगडकर खुश झालेत. आता तर आपण हुकुमशाहीविरोधात उभे राहिलो आहोत. रायगडमध्ये जास्त प्रचार करण्याचीही गरज भासणार नाही. गेल्यावेळी इतके करूनही रायगडकरांनी मोदींविरोधात मतदान केले होते. यावेळी तर मोदींविरोधात त्सुनामीने मतदान होणार आहे अशा शब्दात उद्धवठाकरेंनी खासदार सुनील तटकरेंना टोला लगावला. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button