
चिपळुणात ७० टक्के सर्वेक्षण पूर्ण*
गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या धर्तीवर सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. तालुक्यातील ६६ हजार ९५९ कुटुंबियांची माहिती घेण्यासाठी ६९९ प्रगणक कामाला लागले आहेत. आतापर्यंत ७० टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. ३१ जानेवारी याची अंतिम तारीख आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मोठा लढा दिला जात आहे. त्याला आता यशही आले आहे. याच धर्तीवर गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.www.konkantoday.com