- खेड तालुक्यातील लवेल येथे हुंडाई कार फसवणूकप्रकरणी हुसेन मोहम्मद हनिफ परकार (रा. खेड) याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुनील जनार्दन देशमाने (५३, रा. सात्विणगाव) यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी देशमाने व संशयित परकार यांनी एम.एच. ०८ ए.जी. १९७० क्रमांकाच्या पांढर्या रंगाच्या गाडीचा व्यवहार ठरवून ८ लाख ५० हजार रूपयात केला. रक्कमेपैकी १ लाख ७० हजार रुपये रोख व ६ लाख ८० हजार रुपये कर्ज करत कार विकत घेतली. मात्र परकार याने कारचा ताबा न देता कौटुंबिक कारणासाठी चार दिवस वापरतो असे सांगून कार घेवून गेला.www.konkantoday.com
Back to top button