- _चिपळूण :: तालुक्यातील घोणसरे येथील कथा लेखिका सौ. नीला विवेक नातू यांनी लिहिलेल्या ‘आनंदीबाई रघुनाथराव’ या ऐतिहासिक कादंबरीचे प्रकाशन शनिवारी (दि. ३) सायंकाळी ५.३० ते ८ यावेळेत शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात पुष्करसिंह पेशवा आणि सौ. आदितीदेवी पेशवा (अत्रे) यांच्या हस्ते होणार आहे. या ऐतिहासिक कादंबरीच्या नायिका मुत्सद्दी व्यक्तिमत्त्वाच्या आनंदीबाई या रघुनाथराव ऊर्फ राघोबादादा पेशव्यांच्या पत्नी होत. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्यावातीने या प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रकाशन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक आणि इतिहासाचे व्यासंगी प्रकाश देशपांडे, इतिहासतज्ज्ञ महेश तेंडूलकर, चिपळूण नगर परिषदेचे प्रशासक/मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, दिलीपराज प्रकाशनचे संचालक मधुर बर्वे, लेखिका सौ. संध्या साठे (जोशी) उपस्थित राहाणार आहेत. ‘आनंदीबाई रघुनाथराव’ या ऐतिहासिक कादंबरीच्या प्रकाशन सोहोळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन वाचनालयाचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे, कार्यवाह विनायक ओक यांनी केले आहे.www.konkantoday.com
Back to top button